पीडी-एफ़ ९९५, पीडी-एफ़  फ़ॅक्टरी , अशा काही युटिलिटीज़ जालावर (मोफत) उपलब्ध असतात. त्या आपल्या यंत्रावर स्थापन केल्यावर आपल्या मुद्रक-यादीत एकाची (पीडी-एफ़) भर पडते. मग कोणताही दस्तऐवज छापताना तो मुद्रक निवडून छपाई केली की आपसुक पीडी-एफ़ धारिणी तयार होते. हा मार्ग आमच्याकडे वापरात आहे. पैसे न दिल्यामुळे त्यांच्या जाहिराती बघणे भाग पडते तेवढाच ताप.
[आपल्याकडे दुसरीकडून आलेल्या असल्या धारिण्यांची तोड-फोड करण्यासाठी अन्य कार्यक्रमसुद्धा (बहुधा बेकायदेशीर) असतातच. तेही वापरण्याची वेळ कधीमधी येते. आम्हा भारतवासी लोकांच्या जीवनात कायदा पाळण्यापेक्षा मोडणे अधिक हे वेगळे सांगायला नको.]