निरजा,

मी दि.८/६/२००६ रोजी संघात प्रयोग पाहीला.

पहिल्या १५ मिनिटातच कंटाळलो, कदाचित मला ज्ञान कमी असेल, पण आम्ही तीघेही मीत्र उठून गेलो.  कविता असल्या तरी कुठेतरी त्या एका कथेत गुंफलेल्या हव्या होत्या. ज्याला एक समान सुत्रानी बांधून कथाविष्कार अपेक्षीत होता.

नेपथ्य, प्रकश योजना, संगीत उत्तम, आवडले.  कलाकार जीव ओतून काम करत होते. दिग्दर्शन आनि संकल्पना नवीन पण चांगली होती.

मी देखील अनेक नाटकातून, विषेशता साहित्य संघ मंदिराच्या, काम आणि नेपथ्य करतो. यंदाच्या राज्यनाट्य स्पर्धेत आम्हाला ६ बक्षीसे मिळाली आहेत.

खूपच स्पष्ट मत व्यक्त केल्यामुले रागवू नये.

एकुण उपक्रम स्त्युत्य.

उत्तराची वाट पहात आहे

आपला

अरुण फडके