चर्चा भरकटत आहे आणि हे जवळजवळ वैयक्तिक पातळीवरील वैरासारखे होत आहे याची जाणीव ठेवूनही हा शेवटचा प्रतिसाद नोंदवतोः

मनोगतावर लेखक-वाचक हा थेट संबंध आहे. कारण इथे वाचक एखादा लेख वाचताच दुसऱ्या क्षणी त्याला प्रतिसाद देतो. मग कदाचित प्रतिसाद देणारासुद्धा तेवढीच अश्लील भाषा वापरू शकतो. असे २५ प्रतिसाद येऊ शकतात!! मग कदाचित लेखक त्या प्रतिसादांना पुन्हा उत्तर देतो. त्यात पुन्हा अश्लील भाषा येऊ शकते. कारण मूळ लेखातच जर काही अश्लील stuff असेल तर त्या अनुषंगाने त्यामागून येणाऱ्या प्रतिसादात, प्रतिप्रतिसादात पुन्हा अश्लील भाषा येऊ शकणं हे स्वाभाविक आहे. नाही का? मग हे सगळं थांबणार कुठे?

पुस्तकाच्या बाबतीत असं होत नाही. लेखक लिहून मोकळा होतो. त्यामुळे अश्लील भाषा असलेल्या एखाद्या पुस्तकातून होणारा परिणाम आणि मनोगतासारख्या ओपन फोरम मधून होणारा परिणाम यात माझ्या मते खूप फरक आहे.  

आपण जी यादी दिली आहे ती सगळी पुस्तके आहेत आणि हे एक संकेतस्थळ आहे. एखाद्या पुस्तकात भ वरून सुरू होणारी शिवी, किंवा एखादा अश्लील मजकूर हा सहज खपून जातो. पण मला सांगा, अशीच एखादी सणसणीत अश्लील शिवी मनोगतावरदेखील तेवढ्याच सहजतेने वापरता येईल का? वापरावी का?? अहो, मी म्हणेन की एकवेळ पुरूष मंडळींचं सोडा, पण इथे चांगल्या घरच्या लेकी-सुनाही आज तेवढ्याच सहजतेने अगदी घरच्यासारख्या वावरत आहेत. मला सांगा रावसाहेब, अहो त्यांना का उगाच या असल्या लेखांचा त्रास? त्यांना एंबरेसिंग वाटणार नाही का? आपण म्हणता त्याप्रमाणे वरील सर्व मंडळींनी त्यांच्या त्यांच्या पुस्तकात काही अश्लील लिखाण केलं असेल, पण म्हणून इथेही आपण कमरेचं सोडून लिहिलं पाहिजे असं आहे का?

ही मुक्ताफळं 'शिटणं...!!' या सभ्य शीर्षकाखाली प्रतिसाद दिलेल्या महाशयांनी मी काही दिवसांपूर्वी लिहीलेल्या एका लेखावर उधळली आहेत. 'शिटणे, लेंड्या' अशी भाषा वापरताना आपणच काही दिवसांपूर्वी 'मनोगत' वर सभ्यच भाषा वापरली जावी अशी शेंडीगाठ मारली होती हे हे महाशय सोयीस्करपणे विसरले आहेत. सभ्य भाषेच्या वापराचा आणि 'मनोगत' वरील संस्कृतीसंरक्षणाचा मक्ता आपण घेतला आहे अशा भ्रमात असलेल्या महाशयांचा पर्दाफाश होऊन त्यांचे दुतोंड या निमित्त्तानं समोर आलं, हे बरं झालं. घाव जिव्हारी लागला की माणूस तारतम्य गमावून बसतो आणि 'अहो रुपम अहो ध्वनी' यातला फोलपणा स्वतःच्या नाही तरी इतरांच्या लक्षात येऊन पितळ उघडे पडते हेच खरे.