बापरे ! शहारा आला अंगावर आणि लहानपणी भूक लागू नये म्हणून पंचाने पोटाला आवळून झोपणाऱ्या बाबांचं अनुभवकथन आठवून पोटात कालवाकालव होऊन डोळ्यात पाणी उभं राहिलं.

जीएंची ही कथा मी आधी वाचली नव्हती. आत्ता वाचली आणि खूप खूप भावली मनाला. ही कथा इथे टंकून वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, सन्जोपराव.