मनोगत वरचे गढूळ वातावरण निवळावे यासाठी (मी धरून) सर्वांनी काय करावे याविषयी मंथन व्हावे म्हणून हे लिखाण.

काहीही करू नये!

खरोखरच काहीही करण्याची गरज नाही.
चर्चेत मांडलेल्या भीतीला आधार आहेच. पण समाज आणि म्हणून मनोगतीही हा तसा आपल्या कल्पनेच्या पलीकडे समजूतदार असतो. थोडा वेळ रेंगाळेलही, पण एकूणच त्याला बरबटलेल्या चिखलाचे वावडे असते.
तेंव्हा समाजाच्या अंगभूत शहाणपणावर भरवसा ठेवून निश्चित असावे.

गढूळ वातावरण निवळावे यासाठीचे प्रयत्न हे बहुतेकवेळा -- कळत वा नकळत -- काहीनाकाही स्वरूपाच्या विकृती निर्माण करतील इतकेच!
अश्या प्रकारे साधलेला निर्मळपणा हा ही खरेतर एक प्रकारचा गढूळपणाच... फक्त राजा नागडा आहे असे कोणी म्हणायचे नाही इतकेच!!