तुम्ही मांडलेले अनेक मुद्दे पटण्यासारखे आहेत. ह्यापैकी अनेक मुद्द्यांवर ह्याआधी जबरदस्त गुळगुळीतचर्चा झाल्या आहेत. पाठ खाजवण्यावरही चिमटे काढून झाले आहेत.
मनोगत हे काही न्यूयॉर्कर नाही. त्यामुळे गंभीर लेखनासाठी, लेखकांसाठी तसे वेगळे संकेतस्थळ हवे. मनोगताचे न्यूयॉर्कर झाल्यास इतर मनोगतींचे कसे होईल. असो.त्यामुळे माझ्यामते मनोगत ह्या संकेतस्थळापासून अवाजवी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. इथे रसिकरंजनी, लोकरंजनी लेखन होणारच. बरेच देशस्थ, परदेशस्थ मराठीजन इथे विरंगुळ्यासाठी येतात. मराठीतून वाद, विवाद, संवाद साधण्यासाठी येतात. मनोगत त्यांची कम्युनिटी वेबसाइट आहे, असा माझा समज आहे. हेवेदावे, डावेउजवे, कानपिचक्या, हमरीतुमरी, हिरमुसणे इत्यादी गोष्टी ओघाने आल्याच. त्याबाबत फारसे गंभीर होऊ नये, जजमेंटल होऊ नये असे माझे मत आहे. आपण आपले मत नोंदवून मोकळे व्हावे. तसेच ह्या गोष्टींमुळेच मनोगत हे प्रशासकांच्या शब्दांत 'सचेतन' राहिले आहे हेदेखील विसरायला नको.तूर्तास एवढेच.
चित्तरंजन भट