रोहिणिताई,

कथा छान आहे.

'सिध्दी' हा म्हटलं तर फार मोठा आणि तेवढाच फसवा शब्द आहे. ती प्राप्त करून काही चमत्कार वगैरे करता येतात यावर कधी विश्वास ठेवू नकोस.

तात्यांच १००% बरोबर.

पण काही लोक आपल्या सामान्य माणसांपेक्षा वेगळे असणे सहज असते. याला त्यांची साधना कारणीभूत असते तर कधी त्यांचे अंगभूत गुण. टेलीपथी, टेलेकनिसिस, ESP, रेकि सारख्या गोष्टि जर तुमच्या वाचनात किंवा पहाण्यात आल्या असतील तर त्यातील काही शिकता येण्या सारख्या आहेत तर काही एखाद्याचे सहावे इंद्रिय अधिक सक्षम असल्याने त्यांच्या ठायी त्या उपजतच आहेत. याला अतर्क्य सिद्धी अस म्हणण्या पेक्षा त्या माणसांकडे सामान्यांपेक्षा थोडे काही अधिक आहे एवढच मला वाटत. (जशी गाण्याची कला उपजत असावी लागते आणि साधनाही लागते, दोहोंनी जे हाती लागते ती ही सिद्धीच.)

तुम्ही जर डेव्हिड ब्लैन डेव्हिड कॉपरफिल्ड (illusionist) कार्यक्रम पाहिले असतील तर हि माणसे काहीतरी अचाट करतात जे सामान्य माणसाला अनाकलनिय आहे. पण म्हणून ते बाबा बुवा नाहीत. त्यांनी दाखवलेल्या काही गोष्टी डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून ही खऱ्या नाहीत. अशाच एका सुप्रसिद्ध बाबांविषयी काही वाचनात आल होत. या बाबांवर काही शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि निष्कर्ष काढला की या बाबांच्या ठायी नक्कीच काही अतिंद्रीय गोष्टी आहेत परंतु प्रसिद्धी लोलुपतेच्या पायी ते त्यांचा अनाठायी वापर करतात.

ज्योतिष शास्त्राविषयी ही असेच काहीसे. आकडेमोड, पत्रिका पाहून ज्योतिष वर्तवणारे अनेक पाहिले असतिल पण कुठल्याही माहिती शिवाय काहीतरी सांगून जाणारे "ज्योतिषी" ही असतात. अमेरिकेत "सायकिक", माध्यम व्यक्तींचा फार मोठा भरणा आहे. त्यांनाही असच सामान्यांपेक्षा वेगळ दिसत असत. खऱ्या ठरणाऱ्या स्वप्नांबद्दल ही वाचल असेल.

अस करणारी माणसे १००% बरोबर असतात असे नाही पण त्यांच्या "सिद्धी" योगायोगापेक्षा अधिक प्रमाणात खऱ्या ठरतात.

आता वळूया तुमच्या गोष्टीकडे. मला त्यातील सत्यासत्य माहित नाही पण शक्यता आहे की ती केवळ नजरबंदी असावी, त्यातून ज्या काळात तुमच्या आजोबांनी ही गोष्ट अनुभवली त्यावेळी माध्यमांच्या कमतरते मुळे, सांगोवांगीच्या गोष्टींमुळे कींवा तिखट मीठ लावण्याच्या सवयींमुळे त्यांच्यापर्यंत आलेली गोष्ट १००% खरी असेलच असे म्हणता येणार नाही. अर्थात, विश्वासू माणसाने सांगितलेली गोष्ट आपण खरी मानतो, त्याप्रमाणे समजा कि तुमच्या आजोबांना त्यांच्या जवळच्या मित्राने ही गोष्ट सांगितली त्यांनी खरी मानली, तुम्हाला तुमच्या आजोबांनी सांगितली तुम्ही खरी मानली. मीही हेच करेन.

तेव्हा काही माणसं आपल्या पेक्षा "वेगळी" असतात हे सत्य. तुम्ही सांगितलेल्या सिद्धीविषयी अनभिज्ञ.

प्रियाली