मा. संजोप राव,

आपण मांडलेले मुद्दे बरोबर वाटतात.

एका वादातले संदर्भ दुसरीकडे देऊन वैयक्तिक पातळीवर टोलेबाजी करणे

हा प्रकार अतिशय खराब होय. आणि बऱ्याचदा अनुभवास येतोय.

प्रत्येक चर्चा ही वेगळी आहे , तिचे मुद्दे वेगळे आहेत, तिचा शेवटी निघणारा (जर निघालाच तर) निष्कर्ष वेगळा आहे हे समजुन सगळ्यांनी प्रतिसाद दिले तर आपण सध्या काहीवेळा अनुभवतो तसे होणार नाही (किंवा प्रमाण कमी होईल)

दुसरे असे की, काही वेळा लेखनाच्या 'मूड' मध्ये लोक काही "ठेवणीतले शब्द" वापरतात, ते काहींच्या मनाला लागतात, भावना दुखावतात, कधी कधी अपमानास्पद वाटतात.

मग "आता याला  दाखवतोच"अशा विचाराने प्रतिसादावर प्रतिसाद दिले जातात. नकळत मूळ चर्चा केव्हा बाजुला राहीली ते कळत नाही आणि चर्चेला व्यक्तिगत रूप प्राप्त होते.

तर मला असे वाटते की जर प्रत्येकाने प्रतिसाद देताना जर "शब्द" जपून आणि संयमीत वापरले तर कदाचीत येणारे प्रतिसादही तसेच येतील, आणि साहजीकच चर्चा ही भरकटुन व्यक्तिगत होण्यास प्रतिबंध लागेल.

पुढे जाऊन, एखाद्या चर्चेत जर कोणाचे मुद्दे आपल्याला पटले तर निखळ मनाने ते मान्य करण्याचा मनाचा मोठेपणा "जोपासायला" हवा. त्यामुळे चर्चा उगाच लाबत जाणार नाहीत.

उदा. "मनोगत संघिष्ठ..." चर्चेचे जनक...मा. मनकवडा यांनी आपला गैरसमज झाला हे मान्य केले.  आणि त्यांच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक/स्वागत केले.

मला तरी एवढेच वाटते, की आपण जग बदलु शकत नाही, केवळ स्वतःला बदलले म्हणजे झाले.

बाकी, धान्यात काही "खडे" असायचेच ... ते कसे बाजुला करायचे/सारायचे हे ज्याचे त्यानेच ठरवले पाहीजे...

आपला,

--सचिन