रसिकहो -
घोटाळा निस्तरण्याचा प्रयत्न येथे करतो आहे. काही प्रश्न/शंका राहिल्यास आपण जरूर समोर आणाव्यात.
-----------------------------------------------
न = १ साठी सरळसोट (trivial) सिद्धता आहे. - घोळक्यातील एका मुलीचे डोळे निळे म्हणजे सगळ्याच जणींचे डोळे निळे! येथे घोटाळा नाही!!
तसेच वेदश्रीला दिलेल्या प्रतिसादातील -- दुसरी पायरी सविस्तरपणे - नियम ५ मुलींसाठी सिद्ध असेल तर त्यावरून ६ मुलींसाठी सिद्ध करू या! -- सिद्धताही अगदी बरोबर आहे. यातही घोटाळा नाही.
-----------------------------------------------
अडचण आहे ती न = य + १ = २ साठी! (म्हणजे य = १!)
दुसऱ्या पायरीतील सिद्धता फक्त न > २ असेल तरच लागू पडते. न = २ साठी ही सिद्धता कोलमडून पडते.
मेखः एका नीलाक्षीला बाजूला घेतल्यानंतर पहिल्या कंपूत एक तरी सुंदरी उरणे हे दुसऱ्या पायरीच्या यशासाठी आवश्यक आहे. पण अशी सुंदरी मागे उरणे हे युवतींची केवळ दुक्कलच असल्यास शक्य नाही!
-----------------------------------------------
घोळ खरे तर वर निस्तरला आहेच. केवळ सोयीसाठी विस्ताराने स्पष्टीकरण पुढे दिलेले आहे.
२ मुलींचा गट - वेदश्री, आणि ऐश्वर्या.
आता हे सिद्ध करायचे आहे की जर या २ जणींच्या गटांत एखादी जरी नीलाक्षी असेल तर सर्वच जणी नीलाक्षी असतील! तर या गटात ऐश्वर्याचे डोळे निळसर आहेत (घारे... पण निळसर म्हणू या!).
-----------------------------------------------
जाहीर प्रतिसाद, तसेच व्य नि द्वारा चर्चा यांतून आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे... त्यांत राहिलेल्या त्रुटी हा केवळ माझा दोष समजावा; मूळ गणितातील -- आणि गुरुदेवांच्या क्षमतेतील -- अपुरेपणा नक्कीच नाही. पुन्हा एकदा! हा केवळ विनय नव्हे!!
असो... या गणितांत आपण रस घेतल्याने मनापासून आनंद आहे. धन्यवाद.