प्रियाली, (आणि रोहिणीताई),

तुम्ही जर डेव्हिड ब्लैन डेव्हिड कॉपरफिल्ड (illusionist) कार्यक्रम पाहिले असतील तर हि माणसे काहीतरी अचाट करतात जे सामान्य माणसाला अनाकलनिय आहे.

वरील कार्यक्रम हे हातचलाखीचे असतात.  आपल्याकडे त्यांना जादूचे प्रयोग म्हणतात.  ते मुख्यत्वेकरून करमणुकीसाठी (entertainment) असतात.  त्यात त्या मंडळींची साधना असते.  केवळ सामान्य माणसाला अनाकलनीय म्हणजे अद्भुत मानणे हे सुशिक्षित, आणि सर्वसाधारण समज (common sense) असलेल्या व्यक्तींना शोभत नाही. 

ही गोष्ट म्हणून छान आहे.  विसोबा खेचरांशी पूर्ण सहमत.

अमेरिकेत "सायकिक", माध्यम व्यक्तींचा फार मोठा भरणा आहे. त्यांनाही असच सामान्यांपेक्षा वेगळ दिसत असत.

या तुमच्या विधानाला काहीही आधार नाही.  गोष्टींमध्ये आणि क्वचित व्यवहारात असले लोक आढळतात.  पण ते अपवादानेच.

आपण अंधश्रद्धा निर्मूलन समीतीचे काम जाणून घेतले आहे का? नसल्यास जरूर बघा.

आपला
परभारतीय