मस्करी करता काय राव?
लोकांचे प्रतिसाद थोड्या काळजीपूर्वक वाचा महाशय. आपल्याला हवीत ती वाक्य उचलून असले अर्थ काढण्यापेक्षा माझ्या प्रतिसादातील हवे ते शब्द उचलून जोडा आणखीन मस्त अर्थ निघतील.
मी या दोहों व्यक्तींचे दुवे दिले आहेत वर हे ही सांगितलय की "ते बाबा बुवा नाहीत. त्यांनी दाखवलेल्या काही गोष्टी डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून ही खऱ्या नाहीत." आपल्याला हातचलाखी, संमोहन शास्त्र, illusions यातले फरक माहित असावेत अस धरुन चालूया. नाहीतर बिचारे संमोहन तज्ञ हातचलाखी करतात म्हणून मार खायचे. हे दोघे डेव्हीड काय करतात याची मला कल्पना नाही अस धरुन चालताय का?? की आपल्याला हवी तेवढीच वाक्य वाचताय?
अमेरिकेत "सायकिक", माध्यम व्यक्तींचा फार मोठा भरणा आहे. त्यांनाही असच सामान्यांपेक्षा वेगळ दिसत असत.
उपरोध/ उपहास या शब्दांच्या व्याख्या माहित असाव्यात आपल्याला. नसल्यास माझे बाकीचे प्रतिसाद वाचा. अंधश्रद्धा म्हणजे काय तेही कळून येईल.
गोष्टींमध्ये आणि क्वचित व्यवहारात असले लोक आढळतात.
चुकताय का राव? अमेरिकेत असले बरेच लोक "व्यवहारात" आहेत. उदा. सिल्व्हिया ब्राऊन, जेम्स व्हान प्राग. अमेरिकन टि व्हीवर मिडिअम, सायकिक डिटेक्टिव्ह सारख्या मालिकाही येतात. (उदा. ची जंत्री देऊ शकते) "अमेरिकन सायकिक" असा गुगल वर शोध करा आणि येणारे दुवे "क्वचित" आहेत का ते सांगा. आपल्याला सामान्यांपेक्षा जास्त कळत असा त्यांचा दावा आहे. मी कोण सांगणार हो, मी फक्त घटना दिल्या, दाखवल्या, असे "वेगळे" लोक असू शकतात एवढेच सांगितले.
असे लोक सामान्य लोकांना भुलवण्यात तरबेज असतात. ते पूर्वी ही होते आणि आता ही आहेत या पेक्षा मला काही अधिक सांगायचय अस तुम्हाला का वाटून गेल असाव बरं? काळजीपूर्वक न वाचण्याचा परिणाम असावा का? असल्यास पहिल्या प्रतिसादातील शेवटचा मोठा परिच्छेद पुन्हा वाचा.
बाकी त्या बिच्याऱ्या डेव्हीड कॉपरफिल्डच्या जादूच्या प्रयोगांना हातचलाखी म्हणाव यावर हसाव कि किव करावी?
'सिध्दी' हा म्हटलं तर फार मोठा आणि तेवढाच फसवा शब्द आहे. ती प्राप्त करून काही चमत्कार वगैरे करता येतात यावर कधी विश्वास ठेवू नकोस.
तात्यांच १००% बरोबर.
हे नाही वाचलत????
बाकी, मजा वाटली तुमचा प्रतिसाद वाचून.