जीओसिटीज ज्यातऱ्हेने संकेतस्थळ बांधायला मदत
करते, त्यामार्गाने जाऊन मला चित्रे चढविणे, दुवे पुरविणे, मजकूर लिहिणे
हे जमले आहे. पण पी डी एफ् चा मार्ग दिसलेला नाही... त्यामुळेच खरे तर हा
चर्चाप्रपंच!
जिओसिटीज च्या संकेतस्थळावर (स्वतःचे याहू
सदस्यत्व वापरून) येण्याची नोंद केल्यावर "जिओसिटीज़ कंट्रोल पॅनल" मधील
"मॅनेज" वर टिचकी मारा.

पुढे येणाऱ्या पानावर "फाइल मॅनेजर" वर टिचकी मारा.
पुढील पानावर "ओपन फाइल मॅनेजर" वर टिचकी मारा.
यानंतर आतापर्यंत तुम्ही चढवलेले सर्व साहित्य तुम्हाला दिसेल.
वरील-उजव्या कोपऱ्यात "अपलोड फाइल्स" वर टिचकी मारून तुम्हाला हवी ती फाइल
(पीडीएफ, चित्र, इ. इ.) चढवता येईल. तसेच फाइल मॅनेजर वापरून, फाइलींची
नावे बदलणे, काढून टाकणे इ. नेहमीची कामे सहज करता येतील. प्रत्येक
फाइलच्या पुढे असणाऱ्या "View" चा दुवा म्हणजे त्या फाइलचा दुवा असेल.
या माहितीचा उपयोग होईल अशी आशा करतो.
सचिनराव
आणि संजोपराव, तुम्हाला "शून्य" आवडले हे वाचून आनंद झाला. आवर्जून
प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल मी आपला आभारी आहे. ("शून्य" मनोगतावर
प्रकाशित झाले होते, इथे पाहता येईल. )