समग्र अमेरिकावासी एकावेळी असे शक्य नसेल तर लहान गटांमध्ये -- प्राधान्य देऊन त्यासाठी प्रयत्न केल्यास काही तास आनंदात घालविणे अशक्य नाही.

--- सहमत आहे. त्या दृष्टीने विचार चालू आहे. मात्र यासाठीही मनोगती या देशात कुठेकुठे राहतात, हे कळणे आवश्यक आहे. मी दिलेल्या यादीव्यतिरिक्त मनोगतींनी स्वेच्छेने आपण कोठे राहतो हे व्य नि द्वारे कळवण्याचे आवाहन मी केले होते. मात्र त्याला दोन दिवस उलटून गेल्यानंतरही आतापर्यंत फक्त एकच व्य नि आल्याने एकूण उपक्रमाबाबत मनोगतींचा नक्की उत्साह किती आणि त्यायोगे उपक्रमास मिळणारा प्रतिसाद आणि मुख्य म्हणजे वेळेचे व आवश्यक ते अन्य योगदान याची कल्पना येत नाही ः(

प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद नक्कीच जास्त असेल, या मताशी सहमत आहे.