खरंतर प्रत्येक माणूस थोडाफार नोस्टालजीक किंवा 'रम्य भूतकाळात रमणारा' असतोच. आणि तसंही भूतकालात थोडंफार रमलं तर काय बिघडलं? मी तर म्हणतो जे अजीबात नोस्टालजीक नसतील त्यांनी जरूर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी!
प्रश्न आहे तो अशांचा जे आयुष्यात मर्यादेबाहेर नोस्टालजीक असतात त्यांचा. म्हणजे खर्या अर्थानं भूतकाळाची आठवण काढत स्वमनोरंजन करणार्यांचा किंवा नोस्टालजीकपणाचा आव आणणार्यांचा.
पहिल्या प्रकारातले शक्यतो धंदेवाईक किंवा स्पर्धात्मक जगात अयशस्वी तरी ठरलेले असतात किंवा तद्दन आळशीच असतात. या लोकांना मनातून अद्ययावत जगाची भीती वाटत असते त्यामुळे ते काहीच न करता स्वप्नरंजनातच मश्गुल होणं पसंत करतात. यांचं जीवन अक्षरशः क्षुद्र निरुपद्रवी किड्यासारखं असतं.
दुसर्या प्रकारतले म्हणजे नोस्टालजीकपणाचा आव आणणारे मात्र महा धोकादायक. यांच्या पासून चार हात लांबच रहावं. यांच्या डोळ्यात कधीही आणि हटकून टचकन पाणी येऊ शकतं! अज्ञान दडवण्यासाठी यांचा गळा दाटून येतो म्हणजे मग यांना जास्त बोलवंही लागत नाही !
हे दोन्ही प्रकारचे लोक थोडक्यात नालायकच, पण जगात सगळ्याच समाजात आढळतात. तद्वतच आपल्या मराठी समाजातही सापडतात. यांच्या बद्दल चर्चा करण्यात तरी वेळ कशाला घालवायचा?
मिलिंद