दिवसभराच्या कामाने जबरदस्त थकल्याने हा सामना अनुभवणे हुकलं माझं. वृत्तपत्रांमध्ये या सामन्याची अनेक वृत्तं वाचली मी पण मनोगतवरच्या वृत्तात नक्कीच काहीतरी झकास .. तेही आपल्या मराठीत..वाचायला मिळणार माहिती होतं. ते मिळालंच. :-) 

छ्या ! सगळं आयुष्यच रद्दी झालंय ! शेवटच्या क्षणाला सामन्याने रंग बदलताना ते बदलते रंग बघायला मी हवे होते ( मी या जगात आहेच पण सामन्यासाठीच्या प्रेक्षकांमध्ये असायला हवे होते असं म्हणायचं होतं ! :D ).. हा लेख वाचून माझी हूरहूर आणखीन वाढली.. आता पुढचे सामने तरी बघणे जमवायलाच हवंय मला..

मेघदूत, लिहित रहा हे वेगळ्याने सांगायला नको ना आता? प्लिज लिहित रहा..