या शनिवारी संध्याकाळी ( माझ्या ! ) ठेवुया का इ-कट्टा - भाग १?
कोणाकोणाला जमू शकेल उपस्थित रहायला?
वेळ साधारण काय ठेवुया कारण मला '७च्या आत घरात' नसलं तरी 'नेटकॅफे बंद व्हायच्या आत त्यातून बाहेर' नक्कीच पडावे लागेल ! गप्पा मारण्यासाठी उपलब्ध वेळेचा जास्तीतजास्त सदुपयोग कसा करून घेता येईल याबद्दल विचार करता बोलण्याचे विषय मर्यादीत असतील तर जास्त सोपे होईल असे वाटते. मग काय विषय ठेवायचे? की नाही ठेवायचे कुठले विषय?
कट्ट्यामध्ये सहभागी व्हायला माईक,स्पीकर, वेबकॅम या सगळ्या गोष्टी मँडेटरी आहेत का?
या गोष्टीशिवाय नाही का चालू शकणार?
नुसत्या शाब्दीक इ-गप्पांचा कट्टा केला तर?