प्रत्यक्ष भेटणे हे जालामार्फत भेटण्यापेक्षा चांगले असे वाटते.

सहमत.

भौगोलिक अंतरामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च हे प्रमाणापेक्षा जास्ती येऊ शकतात. (विमानाने जा अथवा चारचाकीने इंधन हे लागणारच. त्याच्या किंमती कडाडल्यामुळे प्रवासही पूर्वीपेक्षा खर्चीक झाला आहे.) इथे 'मनोगत'वर अमेरिकास्थित चक्रपाणिसारखे विद्यार्थी आहेत जे कष्ट करून शिक्षणासाठी अक्षरशः पै- पै जमवतात. सदर खर्च अश्या विद्यार्थ्यांना परवडेलच असे नाही. संगणकीय कट्टा केल्याने या सर्वाला चाट मिळेल असे वाटते.

तसेच एकमेकांपासून चार-पाच (चारचाकी प्रवास)* तासांच्या अंतरावर राहणारे सभासद एकमेकांना एखाद्या शनिवार-रविवारीही सहज भेटू शकतात. पण ८, १०, १५, २०, २५ किंवा ३० (चारचाकी प्रवास)* तासांच्या अंतरावर राहणारे सभासद इतक्या सहजतेने भेटू शकतील असे वाटत नाही.

भारतातले सभासद मुख्यतः पुणे आणि मुंबई इथे एकवटले असल्याने कट्टा कुठेही झाला तरी प्रवासाचा वेळ आणि खर्च आटोक्यात असतो. अमेरिकेत अशी परिस्थिती आहे असे म्हणणे धाडसाचे ठरावे.

यावर सुचलेला आणखी एक मार्ग म्हणजे ज्या सभासदांना एकत्र येणे शक्य आहे त्यांनी एकत्र यावे, पारंपारीक कट्टा करावा. आणि ते जिथे जमले आहेत तिथून संगणकीय कट्टा करावा जेणेकरून तिथे येऊ न शकलेल्या सभासदांना सहभागी होता येईल.

*टीप-
एक तास चारचाकीचा प्रवास म्हणजे अंदाजे ६५ मैल किंवा १०४ किलोमीटर.