सोनाली,
अमेरिकन शेजार्यांचे भावनिक, सामाजिक चित्रण अतिशय चित्तरंजक झाले आहे. परदेशातील शेजारच्यांच्या सांस्कृतिक आयुष्यात डोकावून, आपल्या व त्यांच्या संस्कृतीतील साम्यस्थळे शोधण्याचा पहिलाच (बहुधा) प्रयत्न कौतुकास्पद आहे. अजून बर्याच अभ्यासपूर्ण निरिक्षणाची गरज आहे. ते तुम्हाला नक्की जमेलच. कारण त्या साठी आवश्यक अशी चिकित्सक वृत्ती तुमच्या ठायी दिसून येते आहे.
मी सुद्धा गेली २२ वर्षे आखाती प्रदेशात, मस्कतमध्ये, रहात आहे. सुदैवाने मला कायम भारतीय शेजारीच लाभले, आणि दुर्दैवाने मी तुमच्या सारखा, अरब संस्कृतीचा, सखोल अभ्यास करू शकलो नाही. अर्थात, माझ्या स्पॉन्सरच्या सानिध्यात गेल्या १२ वर्षात थोडाफार अंदाज बांधला आहे. पण, त्यासाठी आवर्जून प्रयत्न असे केले नाहीत. (इच्छा जबरदस्त आहे.)
धन्यवाद.