तुमच्याच या प्रतिसादातून उद्धृत-
महाभारत वरवर वाचून समजणे अवघडच आहे.ते समजून घेण्यासाठी त्यातील कालाचा आणि त्या कालातील नीतिकल्पनान्चा विचार करणे आवश्यक आहे. आजच्या कालाच्या नीतिमूल्यान्ची कसोटी लावल्यामुळे घोटाळे होतात.
उदा.देवकीचा आठवा पुत्र कंसास ठार मारणार हे कळल्यावर तो देवकीला ठार मारायला निघाला पण वसुदेवाच्या विनन्ती वरून त्याने त्या दोघांना तुरुन्गात टाकले. त्यांना जर एकत्रच ठेवले नसते तर त्यांना मूल होण्याची शक्यताच नव्हती येवढी साधी गोष्ट कंसाच्या लक्षात आली नसेल असे वाटत नाही,पण त्या काळच्या नीतिकल्पनात ते बसत नसावे. गीतेतील महत्वाचे तत्त्व प्रत्येक पात्रास लावल्यास घोटाळे कमी होतात, ते तत्त्व स्वधर्मे निधनम श्रेयः-----