"जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही" आणि "असणेही नश्वर येथे , नसणेही अक्षय नाही" या सुट्या ओळी सहज आणि सुरेख आहेत. बाकी शेरही छान.
ऋतुगंध म्हणतात त्याप्रमाणे इथे वर्णिलेली परिस्थिती कुणावर आली असेल? बहुसंख्य वाचकांना असा अनुभव नसल्याने केवळ कल्पनाविलासावर भागवावे लागेल असे वाटते. वास्तवापासून दूर असणाऱ्या कल्पनांमुळे एकूण रचनेचा प्रभाव कमी होतो असे वाटते. अर्थात कुणासाठी आणि कशासाठी लिहायचे (स्वतःच्या/वाचकांच्या आनंदासाठी इ. इ.) ह्या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याचे असेल.