निंदनीय प्रकार आहे. दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी असे होते आहे, त्याहूनही मोठे दुर्दैव म्हणजे "हे असेच चालायचे" हे सर्वांना मान्य झाले आहे, लोकांना यात काही चुकीचे वाटतच नाही.
सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या (म्हणजे तसा समजल्या जाणाऱ्या) महाराष्ट्रात अनेक राजकारण्यांनी हा भ्रष्टाचाराचा वेगळा मार्ग शोधून काढला आणि त्यातून त्यांची झालेली भरभराट पाहून इतरही हपापलेले राजकारणी त्यात उतरले आहेत. एका साखर कारखान्यातून मिळणाऱ्या पैश्यांइतका पैसा एका मेडिकल कॉलेजमधून मिळतो असा काहीसा हिशोब असतो असे ऐकले आहे.