यावर सुचलेला आणखी एक मार्ग म्हणजे ज्या सभासदांना एकत्र येणे शक्य आहे त्यांनी एकत्र यावे, पारंपारीक कट्टा करावा. आणि ते जिथे जमले आहेत तिथून संगणकीय कट्टा करावा जेणेकरून तिथे येऊ न शकलेल्या सभासदांना सहभागी होता येईल.

--- या विचाराने माझ्याही मनात ज़ोर धरला आहे. प्राप्त परिस्थितीत हा मार्ग चांगला वाटतो आहे. माझ्या विलिमिंग्टन भेटीप्रसंगी ह्या कल्पनेची यशस्वी चाचणी झाली असल्याने मोठ्या स्तरावर ही कल्पना प्रत्यक्षात आणता येऊ शकते, अशी खात्री आहे.

ज्या सदस्यांना प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसेल, ते आंतरजाल आणि निरोपकाच्या द्वारे सहभागी होऊ शकतात. पण तशी व्यवस्था करण्यासाठी सर्वसमावेशक अनुकूल वेळ ठरवणे महत्वाचे आहे. उदा. कॅलिफ़ोर्नियातील मनोगती प्रत्यक्ष भेटणार असतील, त्यावेळी इतर भागांतील (भारत, युरोप इ. धरून) मनोगतींनी निरोपकावर कधी हजेरी लावायची, हे ठरवावे लागेल. म्हणूनच स्थानिक मनोगतींनी आपले राहते ठिकाण (किमान टाइम झोन) कळवावा, ही विनंती पुन्हा करतो.