निरोन भावस्पर्शी आहे. येथे दिल्याबद्दल क्षिप्राताईंचे मनःपूर्वक आभार.

चिकूच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराद्वारे जीएंच्या जीवनात डोकावण्याचा रावसाहेबांचा प्रयत्नही आवडला. ते विश्लेषण जीएंबद्दल पूर्ण नाही, तरी बऱ्यापैकी कल्पना देऊन गेले. त्याबद्दल रावसाहेबांचेही आभार.

(आभारी)चक्रपाणि

(पूर्ण)अवांतर - रावसाहेब समज़त असलेली सक्तीची कैद ही विचारांना नसून प्रकटीकरणाच्या पद्धतीस आहे असे (मला) वाटते. त्यामुळे आपले विचार मांडताना तरी हात आखडता घेऊ नये, अशी रावसाहेबांना विनंती. जाहीर मंचावर प्रकटीकरण ज़ाचक अगर अशक्य वाटत असेल, तर व्य नि च्या माध्यमातून संवाद साधता येऊ शकतो. कारण विचारांची देवाणघेवाण ही त्यांच्या कैदेच्या संकल्पनेमुळे आटू नये असे माझे प्रामाणिक मत आहे.