मला असे सुचवायचे होते की लेखन प्रकाशित करण्यापूर्वी शुद्धलेखन चिकित्सकाचा वापर करून लेखनातील शुद्धलेखनाच्या चुका दूर करता येतील (ज़से आप'सुख'.. (हे आपसूक हवे), दि'सु'न (दिसून) , 'तु'(तू) इ.) ही छंदबद्ध कविता नसल्याने वृत्तपालनासाठी अगर गेयतेसाठी ऱ्हस्वदीर्घात अशी सूट घेण्याची (poetic license) गरज़ नाही, असे मला वाटते.
कल्पना आणि विचारांच्या सौंदर्याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष लेखन अधिक आनंद देऊन ज़ाते, असे मला म्हणायचे आहे. आपल्यालाही हे पटेल, अशी आशा आहे.