२. मी जात मानत नाही. माझ्या नावावरून जात नष्ट करण्यासाठी केलेला विशेष अर्ज अजूनही शासन दरबारी पडून आहे. बरेच खटाटोप केले तरी तो हालत नाही. आपण सर्वांनी मिळून असे अर्ज केल्यास यश टप्प्यात येईल असे दिसते.
तुम्ही विदर्भातल्या एका गावाबद्दल (नाव आठवत नाही!!) ऐकले आहे का? त्या गावातल्या सर्वांनी मागच्या २-३ पिढ्यांपासून जात नाकारली आहे - फक्त सरकार दरबारी नव्हे तर व्यवहारात सुद्धा. पण आज त्यांना नवीनच जात चिकटली आहे - अजात.