खरे तर अशा गोष्टींची सवय झाली आहे, तरी पण बसायचा तो धक्का बसतोच. धन्यवाद, साती.
या निमित्ताने आणखी एक सत्य घटना आठवली. माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा दहावीला पहिल्या दहात आला. त्याने कोणतीही खाजगी शिकवणी लावलेली नव्हती. निकालाच्या आदल्या दिवशीच सगळी माहिती काढून एका प्रसिद्ध शिकवणीचे संचालक त्या मुलाच्या घरी आले. अभिनंदन,पुष्पगुच्छ, पेढे वगैरे सगळे रीतसर झाले. संचालकसाहेबांनी मग खिशातून पन्नास हजार रुपये काढून त्या मुलाच्या वडीलांसमोर ठेवले.त्यांची अपेक्षा फक्त एवढीच, की त्या मुलाने मुलाखतीत आपण ही शिकवणी लावली होती, असे सांगावे, त्याचे छायाचित्र त्या शिकवणीच्या जाहिरातीत प्रसिद्ध करायला परवानगी द्यावी, इतकेच.
मी ज्या क्षेत्रात काम करतो ते शिक्षणक्षेत्र इतके बरबटलेले आहे ही अस्वस्थ करणारी जाणीव आहे.