संवादिनी,
चालेल. म्हणजे १७ जून ला ना?
हो. शनिवार उर्फ १७ जून उर्फ उद्याच !
पण तुझी संध्याकाळ म्हणजे इकडे कॅलिफ़ोर्नियात पहाट !!ः( रात्री ठेवलास तर बर पडेल.
माझ्या संध्याकाळी ( तुझ्या पहाटे ) सुरू करून माझ्या रात्रीपर्यंत ( तुझ्या सकाळपर्यंत ) कट्टा करूयात. कोणाची टाइपिंग स्पीड जास्त तेही कळेल.. :D
साधारण तुझ्या ८.३० ला. म्हणजे इथे सकाळी ८ वाजता. चालेल का?
मी ७पासूनच वाट बघेन तुमची ! मग चालेल का?
थोड आधीही चालू शकेल.मनोगतींनी त्यांच्या सोयीचा दिवस आणि वेळ कळविल्यास कट्टा ठरविण्यास सोपे होईल.
भारतीय वेळेनुसार १७ जून २००६, संध्याकाळ ७ वाजता. ठीके का?
कट्ट्यामध्ये सहभागी व्हायला माईक,स्पीकर, वेबकॅम या सगळ्या गोष्टी मँडेटरी आहेत का? या गोष्टीशिवाय नाही का चालू शकणार?
का नाही? चालेल की.
सहीच ! मग मला जास्त काही प्रश्न नाही कारण वसतिगृहाशेजारच्या चालण्याच्या अंतरातील नेटकॅफेमध्ये या सोयी नाहीत. पण मला नाही वाटत याने काही प्रश्न येईल.. मी राशीचक्राचा गंमतीशीर कार्यक्रम करू का? :D संवा, माझ्या या कार्यक्रमाच्या नाममात्र प्रस्तावानेच तुझा त्रासलेला चेहरा मी सहजी कल्पून पाहिला आहे.. हाहाहाहा... नाही करणारे.. काळजी नसावी. ;-)
उद्या संध्याकाळी मनोगत इ-कट्टेकऱ्यांची वाट पाहीन मी. कळावे.