रावसाहेब,
तुमच्या अस्वस्थेची कल्पना मी करू शकतो आणि त्याबद्दल फार चीडही येते. तुम्ही म्हणताय तसाच प्रस्ताव, बहुदा याच सर्वश्रुत (आणि स्वयंघोषित नामांकित?) शिकवणीच्या संचालकांमार्फ़त १९९९ मध्ये माझ्यासमोर आणि माझ्या एका मित्रासमोर ठेवण्यात आला होता. आमची बोली अर्थातच त्यांनी एक लाखांपर्यंत लावली होती. विनम्रपणे तो प्रस्ताव नाकारूनसुद्धा खुद्द माझ्या आणि माझी शाळा, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या कानास खडा लागू न देता नाशिक शहरातील एका स्थानिक वृत्तपत्रात या महाशयांनी मला काही महिन्यांसाठी त्यांचा 'ब्रँड अँबेसेडर' म्हणूनही मिरवले होते. माझ्या एका स्नेह्यांनी नाशिकला गेले असताना ते वाचून मुंबईस परतल्यावर सगळा प्रकार सांगितला. पण त्याविरुद्ध काहीही करण्यातली मध्यमवर्गीय पांढरपेशी उदासीनता त्यावेळीही आड आली, आणि चिडण्याशिवाय व उद्विग्न होण्याशिवाय काहीही करता आले नाही ः( ही गोष्ट आज़ही बोचत राहते.