खरे तर अशा गोष्टींची सवय झाली आहे, तरी पण बसायचा तो धक्का बसतोच.
सहमत. कथेच्या सुरुवातीचे ... पात्रे काल्पनिक. निव्वळ योगायोग समजावा.... वगैरे आधी वाचल्यावर, कथेचे विषय-क्षेत्र आणि साक्षात डॉक्टर सातींनीच लेखन केल्यामुळे बसलेला धक्का जबरदस्त होता.
सन्जोप यांनी सांगितलेल्या घटने बद्दल ऐकले होते. पण तीही सत्य घटना आहे या बद्दल खात्री नव्हती. बहुधा अशा ऐकीव गोष्टी खोट्या नसतातच म्हणा. हेही विलक्षण धक्कादायक वाटले.
छाया