ब्राझीलने फुटबॉल वर्ल्डकप १९९४ मध्ये जिंकला. त्याआधी त्यांनी तो १९७० मध्ये जिंकला होता.

१९७० + १९९४ = ३९६४

अर्जेंटिनाने फुटबॉल वर्ल्डकप १९८६ मध्ये जिंकला. त्याआधी त्यांनी तो १९७८ मध्ये जिंकला होता.

१९८६ + १९७८ = ३९६४

जर्मनीने फुटबॉल वर्ल्डकप १९९० मध्ये जिंकला. त्याआधी त्यांनी तो १९७४ मध्ये जिंकला होता.

१९९० + १९७४ = ३९६४

यातूनच आपण २००२ चा फुटबॉल वर्ल्डकप विजेता संघ शोधू शकतो कारण १९६२ मध्ये जो संघ जिंकला असेल तोच परत जिंकला असेल ना...

खरंच की तो संघ होता ब्राझील ! ब्राझीलच तर जिंकला होता फुटबॉल वर्ल्डकप १९६२ आणि २००२ मध्येही !!!

ही जादू काम करतेय नाही? ! मग चला शोधुया का.. कोण असेल फुटबॉल वर्ल्डकप २००६ चा वर्ल्डकप विजेता संघ?

३९६४ - २००६ = १९५८

कोणता संघ जिंकला होता १९५८ मध्ये?

ब्राझील !!!

( जबरदस्त उत्साह संचारवणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपबद्दल दोस्तांशी गप्पा मारताना मिळालेली माहिती फक्त त्याच उत्साहाचा भाग म्हणून इथे दिली आहे. भविष्यवेत्तेपण करण्यात मला काहीही गम्य नाही. खेळातला ऐनवेळचा क्षणाक्षणाला बदलता रंग आणि त्यातून मिळेलसा निख्खळ आनंद उपभोगायलाच धमाल मजा येते. )