प्रिय जयंतराव,

तुमची कविता वाचून मन हलून गेले. दुसऱ्या कोणाचे काहीही झाले तरी आपले सगळे सुखाने चालते ही विदारकता मन विषण्ण करते. ' कुणी सदोदित सूतक धरिले' हे जरी सत्य असले तरी दुसऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची प्रवृत्ती ही तितकीच आहे हेही खरेच.

सध्या वाचत असलेल्या प्रभाकर पेंढारकरांच्या 'चक्रीवादळ' या कादंबरीची तीव्रतेने आठवण झाली.

असो. चांगली कलाकृती जरी शोकात्म असली तरी आनंदच देते. तो आनंद तुमच्या या कवितेने दिला.

शिरीन कुलकर्णी