४९ ओ. मतदान करू न इच्छिणारा मतदार.- जर एखादा मतदार, त्याचा मतदार क्रमांक मतदारांच्या यादीत फॉर्म क्र. १७ए भरल्यावर समाविष्ट झालेला असताना आणि नियम ४९एल च्या उपकलम (१) मध्ये म्हटल्याप्रमाणे त्या यादीत स्वतःच्या नावासमोर स्वाक्षरी केल्यावर अथवा अंगठा उठवल्यानंतर, मतदान करू इच्छित नसेल, तर याबद्दलची नोंद फॉर्म १७ए च्या रुपात तेथिल अधिकारी करून घेईल आणि त्या नोंदीसमोर त्या मतदाराची स्वाक्षरी अथवा अंगठा उठवून घेतला जाईल.
माझे कायद्याचे ज्ञान अगदीच तुटपुंजे आहे तरीही भोमेकाकांनी पाठवलेल्या निवडणुक प्रबंधन नियमावली, १९६१ या दुव्यातील ४९ ओ मधील माहिती मी अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. चु.भू.द्या.घ्या.
पुढच्यावेळेस या कायद्याची छापील प्रतच घेऊन जाईन मी सोबत निवडणुकीच्या वेळेस. दुवा दिल्याबद्दल भोमेकाकांचे मनापासून धन्यवाद.