साती, वास्तव वर्णन. सुंदर समारोप.

मला अनेकदा असे प्रश्न पडतात की कर्त्यांना अशी दांभिकता का अवलंबावी लागते? ती अवलंबून काही फायदा होतो का? मेडिकल कौन्सिल अशा देखाव्याला फसते का? फसावे का? फसत असल्यास दोष कुणाचा? कौन्सिलचा की दंभकर्त्यांचा?

माझ्या मते मेडिकल कौन्सिल हे दिखाव्याचे मंडळ नसते. त्यातील सन्माननीय सदस्य उच्चविद्याविभूषित, व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या अनुभवी व्यक्ती असतात. त्यांनी एकाच दिवशी नव्हे तर सातत्याने, अनेक जणांनी, वेगवेगळ्या वेळी  केलेल्या खऱ्याखुऱ्या तपासण्यांच्या आधारे खरे अहवाल तयार करावेत. म्हणजे चाड नसलेल्या शिक्षणव्यवसायिकांना दोष देण्याचा प्रसंगच उद्भवणार नाही.

पण कुठेतरी पाणी मुरतय. हेच खरे. कुठे बरे मुरत असावे साती ...