खिद्रापूरचे अप्रतिम मंदीर फार कमी लोकांना माहिती आहे. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाल फितीत कसा दुर्लक्षित रहातो याचे (आणखी ) एक उदाहरण. असो.
पश्चिम महाराष्ट्रात सहलीली जाणाऱ्यांनी खिद्रापूरला अवश्य जावे. ( खिद्रापूर माझ्याच तालुक्यात आहे म्हणून त्याचा विशेष अभिमान!)
मीही नुकताच गोव्याला जाऊन आलो. यावेळचा नवीन शोध म्हणजे पणजीच्या १८ जून रस्त्यावरचे 'मत्स्यगंधा' उपहारगृह. परमेश्वराच्या प्रथमावताराला इथे नक्कीच सद्गती मिळत असावी!