पुण्याच्या 'शब्दवेध'ने कवि ग्रेस यांच्या कवितां आणि ललित लेखनावर आधारित 'साजणवेळा' नावाचा एक सुरेख कार्यक्रम केला होता. त्याची ध्वनिफीत उपलब्ध आहे. जरूर ऐका.
त्यांच्या मुलाखतीच्या ध्वनिचित्रफीतीदेखील उपलब्ध आहेत 'संध्यासूक्तांचा यात्रिक' नावाने.पूर्वी मी त्यांच्या मुलाखतीची एक video cassette सुद्धा पाहिलि होती. नाव आठवत नाही अत्ता.
त्यांचे ललित लिखाणही सुरेख आहे. आपल्या मध्यमवर्गीय जाणीवाना धक्का देणारे पण अतिशय संवेदनशील लिखाण आहे. थोडे अंगावर रेणारे असले तरि विलक्षण आहे.