कविता छान आहे. विदारक वास्तवाचे चित्रण.

शेतकरी आत्महत्या करतात त्या भागातले आमदार/खासदार मात्र गब्बर झालेले आहेत. पैसा ओतून निवडून यायचे आणि नंतर पैसे खाण्याशिवाय काहीही करायचे नाही ही दुर्दैवाने परंपरा झाली आहे.

बाकी महासत्ता वगैरे एक खूप मोठा भ्रम आहे असे वाटते. कागदोपत्री आकडेवारीनुसार भारत महासत्ता बनेलही, पण बहुसंख्य भारतीयांचे रोजचे प्रश्न आणि जीवनमान तसेच राहील असे वाटते.