मिलिंद-जी,
नव्या तंत्रज्ञानाचे मला वाटतं फायदे/तोटे दोन्ही आहेत... शेवटी मला फायदे जास्त वाटतात.
तोटे... नको ते दूरध्वनी / निरोप (उदा. वित्तसंस्था, गृहकर्ज इ. साठी) येत राहणं.. (अगदी परदेशात असतानाही असे दूरध्वनी येतात आणि करणाऱ्याचा क्र. न दिसल्यामुळे पैसे फुकट जातात!)
फायदे... अनेक आहेत. संपर्क साधणं खूप सोपं झालंय... माझ्या घरात होत असलेल्या शस्त्रक्रियेच्या २-३ दिवसच आधी मला दिल्लीला जायला लागलं. मला रक्ताची सोय करण्यासाठी मुंबईतल्या बऱ्यांच जणांशी संपर्क करायचा होता. मी दिल्लीत उतरल्यावर कार्यालयात पोहोचेपर्यंत १०-१५ तरी लोकांशी बोललो आणि सगळी सोय झाली.... हेच माझ्याकडे भ्रमणध्वनी नसता तर किती त्रासदायक झालं असतं!
मला तरी फायदे जास्त वाटतात!

- कुमार