"मनोगत" आयुष्याचे काही क्षण , काही मीनीटे, काही तास,मजेत, आनंदात घालवन्याचे व्यासपीठ आहे. बाकी सर्व (सन्जोप राव च्या )डोक्यातील गोंधळ.
अत्यंत आक्षेपार्ह विधान.
डॉ. बिरुटे यांचा 'मनोगत' वरील वावर, त्यांचे विविध चर्चांमधील योगदान हे पहाता त्यांनी या विषयावर गंभीरपणे विचार केलेला नाही असे दिसते. 'मनोगत' ची पाने चाळून बघता 'मनोगत' हे केवळ काही घटका मजेत घालवण्यासाठी नसून बहुतेक वेळा विचारमंथनासाठी आहे, असे लक्षात येते. 'मनोगत' वरील हमरीतुमरीवर येऊन केलेले वाद - उदा. शिवधर्म, किस्से ओकारीचे, अंत्यसंस्कार...इ ( अनेक सांगता येतील ), त्यामुळे 'मनोगतीं' नी परत 'मनोगत' वर न येण्याचे घेतलेले निर्णय, काही वेळा उघड उघड लक्षात येणारी गटबाजी व खोटी स्तुती या गोष्टी रसभंग करतात असे मला वाटते. 'मनोगत' वर नित्यनेमाने येणाऱ्यांनी (काही जणांनी ) या चर्चेत भाग घेऊन त्यांचेही मत तसेच असल्याचे लिहीले आहे.
'मनोगत' केवळ मनोरंजनाचे साधन आहे असे मानणे आणि 'मनोगत' चे बदलते स्वरूप हा मानसिक गोंधळ आहे असे मानणे ( कुणाच्या डोक्यातील हे महत्वाचे नाही ), हे 'मनोगत' चे अवमूल्यन आहे , असे मला वाटते.