कोहम,
मला वाटतं अंगवळणी पडलेल्या वृत्तात (गा गा ल गा ल गा गा) बदल केल्यानं वाचायला थोडा त्रास झाला.
इतकी भरून आहे त्यांच्यात वारुणी की
डोळ्यांत आसवाला जागा उरली नाही
हा शेर आवडला. (आसवाला एकवचनी थोडं खटकलं तरी).
मतल्यात सागर (समुद्र) म्हणायचंय का उर्दू 'साग़र' (मद्याचा प्याला)? उर्दू असलं तर पेल्याची पुनरुक्ती होते.
- कुमार