येथे वर्तमान पत्रांना केवळ व्यापाऱ्यांचीच प्रचारपत्रे म्हणावे का?

काही दिवसांपूर्वीचा अनुभव देते.

TOI च्या मुखपृष्ठावर मॅडोनाचे छायाचित्र झळकले होते. त्या विशिष्ठ दिवशी मुखपृष्ठावर तिचे छायाचित्र देण्या इतपत तिने काही विशेष केले होते यातला भाग नाही. (नवऱ्याशी फारकत घेणे, तिने, ही मी विशेष गोष्ट मानत नाही. असो)

त्या छायाचित्रावर टिचकी मारली असता इतर चित्रे दिसली. त्या खाली लिहिलेल्या ओळी (captions) या गलिच्छ अश्लिल प्रकारात मोडणाऱ्या होत्या.

देशाचे मुखत्यार पत्र समजणाऱ्या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर अशा बातम्या का हे कळायला मार्ग नाही. पण TOI संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर अशाच बातम्या झळकतात हे वारंवार पहाण्यात आले आहे.