मेघदूत,
आपण स्वरज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागणे अपरिहार्य आहे असे मला वाटते. मात्र ते पट्कन आलेच पाहिजे असा आग्रह धरू नये.
गाण्याची स्वरलिपी करणे हे एका परीने हमाली काम आहे. ते स्वतःचे स्वतः केले तर आपले सांगीतिक स्नायू अधिक मजबूत होतील. मी देऊन तुम्हाला काय फायदा?
आणखी एक - पेटी/वाद्य वाजवणे किंवा "मजा येईल" इतक्या सफाईने वाजवायला शिकणे यात स्वरलिपी सोडून इतर खुब्याही येतात व तो एक स्वतंत्र विषय आहे.
तरीही मी तुम्हाला निराश करणार नाही.

५. सारेप ध साऽ रे
    रेरे रे साधप पऽपध
    पध पध प रेसा पऽ पप

६. ध सा गगरे रेगगगग
   प प पऽपप प पप धपऽपप
   पधध धप पगगगग ऽऽरेरेसाध

मूळ लेखातले क्र.२ व वरील दोन गाणी यांतले स्वर तुम्हाला एकाच प्रकारचे वाटतात का? असे असल्यास तुम्ही राग ओळखायला शिकण्याच्या जवळ आलात असे म्हणता येईल.
हा शंकर-जयकिशन यांचा एक आवडता राग - शिवरंजनी - आहे.

तुम्हाला आवडणारे एक गाणे सांगितल्यास मी स्वरलिपी करून देण्याचा प्रयत्न करीन.
दिगम्भा