लोकांना सनसनाटी बातम्या वाआयला आवडतात. त्याचा फायदा वर्तमानपत्रवाले घेतात. हे करतांना त्यांचे रिपोर्टर कॉमन सेन्सही वापरत नाहीत.

सुमारे दोन वर्षांपूर्वी एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला "मुन्नाभाई"च्या धर्तीवर मोबाईलचा वापर करून कॉपी करतांना पकडले होते. सर्व वृत्तपत्रांत त्या बातमींत त्या विद्यार्थ्याची आई दुसऱ्यांची धुणी-भांडी करून घर चालवते असे म्हंटले होते. एकाही बातमीदाराला अशा बाईचा मुलगा मोबाईल कसा वापरू शकतो किंवा त्याला स्वतःचा मोबाईल परीक्षेंत वापरू देणारा मित्र कसा असू शकतो याविषयी चौकशी करावयाचे सुचले नाही.