व्यक्तिशः मला आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे अधिक आणि तोटे कमी आहेत असे वाटते.
ही आधुनिक उपकरणे माणसाचे गुलाम म्हणून तयार करण्यात आली आहेत असे वाटते. पण अनेक लोक या उपकरणांचे गुलाम होतात.
===
भ्रमणध्वनी-
"भ्रमणध्वनी वाजला रे वाजला की उचलायलाच हवा" अशी गुलामी गरजेची आहे असे वाटत नाही. त्याचे अस्तित्व तुमच्या सोयीसाठी आहे, तुमचे त्याच्यासाठी नाही.
आराम/झोप/डुलकी/काम/अभ्यास/बैठक इ. करत असताना मला व्यत्यय नको असेल तर खुशाल बंद करून ठेवतो. जर कोणी मला संपर्क केला असेल तर त्याचा क्रमांक चालू केल्यावर दिसण्याची सोय असतेच.
हेच इतर उपकरणांनासुद्धा थोड्या-अधिक फरकाने लागू होते असे वाटते.
===
आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याबद्दल-
तसे म्हणावे तर वैयक्तिक मुद्दा. पण आंतरजाल/महाजाल न वापरता येणारा तो तुमचा मित्र दूरध्वनी वापरत होताच ना! म्हणजे तो आधुनिक तंत्रज्ञान वापरत होता फक्त काळाच्या थोडा मागे होता. दूरध्वनीचे उपयोग, महत्त्व आणि फायदा कळल्याने त्याने ते तंत्रज्ञान आत्मसात केले.
तसेच आंतरजाल/महाजाल वापरण्याचेही उपयोग, महत्त्व आणि फायदे जेंव्हा त्याला कळतील तेंव्हा तो आपसूक त्याचा वापर चालू करेल असे वाटते.
===
एम.पी.३ वाजवणारे उपकरण मनोरंजनासाठी आहे. जसे वॉकमनशिवाय अनेक लोकांचे चालून गेले तसेच अनेक लोकांचे एम.पी.३ प्लेअर शिवायही चालून जाऊ शकते.