प्रश्न केवळ कॉपीराईट कायद्याचा नाही. जर स्वतःकडे प्रतिभा नसेल तर लोक दुसऱ्याच्या साहित्याची चोरी करून प्रसिद्धी मिळवू पहातात हा आहे.
किमान आपल्या साहित्याचं मूळ कुठे आणि कुणाकडे आहे ह्याचा उल्लेख करण्याचं तरी सौजन्य लेखकाने दाखवलं पाहिजे ; मग कॉपीराईट कायद्यानुसार मूळ साहित्य सार्वजनिक असो वा नसो.
मायाजालावरच्या उचलेगिरीला तर बऱ्याचदा काहीच धरबंध नसल्याने कॉपी पेस्ट करणारे बरेच आहेत. त्यांची उचलेगिरी कुणाच्या लक्षातही सहज येण्यासारखी नसते.
साती काळे.