आधुनिकतेची व्याख्या काळानुसार बदलते. १०० वर्षांपूर्वी विमानप्रवास ही कल्पनाच अशक्य होती. इ‌. स. २१०० मधे काय काय गमतीजमती असतील कोण जाणे. कुमार आणि भोमेकाका यांनी म्हटल्याप्रमाणे मलाही याचे फायदे जास्त वाटतात. आणि उपयोगाचे म्हणाल तर लोकांना एकदा फायदा पटला की आपोआप वापरायला लागतात.


आपल्या शेवटच्या वाक्याशी मात्र मी पुर्णपणे सहमत नाही. वॉकमन शिवाय "चालून" जाउ शकते कारण ती जीवनावश्यक वस्तू नाही. पण नुकताच पाऊस पडून गेल्यानंतर खंडाळ्याच्या घाटात फिरताना, याच वॉकमनमुळे  पं. जसराजांची सुरेख तान जेव्हा अनुभवतो तेव्हा या विज्ञानाला शतशः धन्यवाद दिल्याशिवाय राहवत नाही.