राजकारणाचा व्रतापासून व्यवसायापर्यंतचा प्रवास ह्या लेखात दिसतो. ह्या लेखात गैरकृत्याचे समर्थन केलेले आहे असे वाटले नाही. राजकारण हा व्यवसाय मानला तर त्याद्वारे पैसे मिळवणे आलेच. जरी "तळागाळातील लोकांचे पुनरुत्थान" वगैरे शब्दात राजकारणाची व्याख्या नेतेमंडळी करतात. व्रतस्थ राजकारण्यांसाठी ती योग्य असली तरी ती आता ती अनेकांना लागू होत नाही. त्यामुळे राजकारण्यांनीही हा आपला व्यवसाय असल्याचे जाहीर मान्य करायला काहीच हरकत नसावी, म्हणजे सामान्यांनाही ते तसे मानण्यास हरकत राहाणार नाही.