वाहन आणि पाऊस पडण्याचा सांख्यिकीय संबंध अनुभवाच्या आधारे पूर्वजांनी लावलेला असणं शक्य आहे. सरासरी पावसाच्या प्रमाणानुसार वाहनाचे नाव ठरवले असणे अशक्य नाही. पाऊस आणि नक्षत्रांचा प्रत्यक्ष कार्यकारण संबंध नसला तरी सांख्यिकीच्या आधारे संबंध लावता येऊ शकतो (जसा तो माझ्या वयातील वाढ आणि वातावरणातील कर्बद्विप्रणिल वायूमध्ये झालेली वाढ ह्यामध्येही लावता येऊ शकतो, म्हणून माझे वाढणारे वय हे वातावरणातील कर्बद्विप्रणिल वायूमध्ये होणाऱ्या वाढीचे कारण होऊ शकत नाही). मात्र असा अभ्यास करणे इंटरेस्टिंग ठरावे.