१.प्लेगचा उंदीरः आधी स्वतः बळी पडून मग लाखोंच्या शरीराच्या विवक्षित भागावर गाठी आणून त्यांना यमसदनाला धाडणारा, तरुण विवाहितांना बळी पाडून त्यांच्या नवऱ्यांच्या पुनर्विवाहाची तरतूद करणारा, 'प्लेगची साथ आहे, घरे रिकामी करा...' अशा बहाण्याखाली ब्रिटीशांच्या अत्याचारांचे कारण बनणारा...
२. अन्नाची नासाडी करणाराः स्वतः खातो त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात नासाडी करतो अशा काही मोजक्या प्राण्यांपैकी एक ( दुसरा तसा प्राणी हत्ती - गंमत बघा - दोन्हीही गणपतीला प्रिय! असो. ). शेतातल्या पिकांचे, धान्याचे अपरिमित नुकसान करणारा
३. प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करणारा - मल्टीप्लाय लाईक रॅट्स (रॅबीट्स?)- या वाक्यप्रचाराचा धनी - एक न संपणारी किळसवाणी डोकेदुखी..
माफ करा प्रियाली, तुमच्या मूषकप्रेमात मी सहभागी होऊ शकत नाही! उंदीर 'क्यूट' वाटण्यासाठी मला दुसरा (उंदरीणीचा?) जन्म घ्यावा लागेल!
फार गंभीरपणे घेऊ नका हो! (हल्ली हे एक लिहावे लागते!)
सन्जोप राव