भावानुवादाच्या दृष्टीने बहरदत्त कलिके चालेल असे वाटते आहे. म्हणजे मूळ भावना अनुवादित करणे अपेक्षित असले तर बहरदत्त कलिके नक्की चालेल.
पण कलिका=कळी आणि मलिका=सम्राज्ञी. म्हणून मलिकेस कलिका हा अनुवादित शब्द चपखल बसत नाही, असे मला वाटते आहे.
'बहारोंकी मलिका'मध्ये ती बहरसम्राज्ञी या अर्थाने अपेक्षित आहे ना? तसेच बहर'दत्त' म्हटल्यास बहरदत्त कलिका म्हणजे खरे तर शब्दशः बहराने (जन्म) दिलेली कळी असे होते (ज़से निसर्गदत्त=निसर्गाने दिलेले) त्यामुळे मग पुन्हा अर्थ बदलतोय.
कदाचित मी आवश्यकतेपेक्षा जास्त खोलात ज़ातोय, पण अर्थाबाबत समाधान होत नसल्याने विचारतोय इतकेच. कृपया गैरसमज़ नसावा.