मी हा विषय मांडला आहे याचा अर्थ माझं त्याला समर्थन आहे असं नाही.

पाऊस मुंबईत पडत नाहीये. दक्षिणेत तर पडतोय. त्यामुळे मला हेच विचारायचे आहे की ही वाहने विशिष्ट प्रदेशाला लागू होतात का? त्याचे काही गणित आहे का? फलज्योतिषावर माझाही विश्वास नाही.

आजच्या मटा ची हेडलाईन पहा. हवामान खात्याने हात टेकले. अशी आहे.

पाऊस पडत नाहीये त्याला हवामान खाते काय करणार? पण हवामानाचे अंदाज आधुनिक वेधशाळाचेही चुकतात हे तर सत्य आहे ना? हवामान खात्याला दोष देण्याचा उद्देश अजिबात नाही. २६ जुलै च्या वेळी त्यांच्यावर नाहक टीका झाली.आपल्याकडे डॉप्लर रडार सारखी यंत्रणाच नाही तर ते तरी काय करणार?

महाभयंकर अशा चक्रीवादळाची पूर्वसूचना आधुनिक विज्ञानामुळेच तर मिळते आणि लाखो लोकांना स्थलांतरीत करता येते. तेव्हा कोणते ज्योतिष मदतीला येते काय?  काही पंडित मेदिनीय ज्योतिषाबद्दल बोलतात की ज्यायोगे नैसर्गिक आपदांचे भाकित करता येते. मग करा ना. पण पळवाट काय शोधणार तर म्हणे लोकांमध्ये घबराट पसरेल. वा!

आपण स्वतःही नेटवरून उपग्रहाने घेतलेला फोटो पाहून पावसाचा थोडा अंदाज करू शकतो.  हे ताजे छायाचित्र पहा  -> इथे पहा